माजी उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या वृद्ध सासू सासऱ्यांनी एकाच वेळी आत्महत्त्या करण्याची घटना सम्पूर्ण शहरात खळबळ माजवून गेली आहे. सध्या त्या दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टम साठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहेत त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत, अशी माहिती मिळाली.
मयत नारायण लक्ष्मण किल्लेकर वय 80 हे एअर फोर्स मध्ये सेवेत होते त्यांची पत्नी वसुंधरा नारायण किल्लेकर वय 68 या मागील काही दिवसांपासून विसमरण तसेच इतर आजारांनी त्रस्थ होत्या. सुहास हे त्यांचे एकुलते मुलगे आहेत.
पूर्वी हे कुटुंब भोई गल्ली येथे राहत होते, सध्याच ते न्यु गुडसशेड रोड येथील विमल प्लाजा अपार्टमेंट मध्ये वास्तव्याला गेले होते.
याच अपार्टमेंटच्या पॅसेज मध्ये या वृद्ध दाम्पत्यांने एकाच वेळी गळफास लावून घेऊन आत्महत्त्या केली आहे. त्यावेळी रेणू, सुहास व त्यांची मुलं हे झोपी गेले होते.
रात्री पावणे दोन च्या सुमारास घरच्या समोर चौकटला जे सी सी टी व्ही आहे त्या सी सी टी व्ही ला चिकट पट्टी लावून सदर घटना रिकॉर्ड होऊ नये याची काळजीही आत्महत्या होण्यापूर्वी घेण्यात आल्याचे प्रकारही उघड झाला आहे.
आपले निधन झाले तर आपल्या पत्नीची देखभाल कोण करणार या भावनेतून हा प्रकार झाल्याची शक्यता आहे.