Friday, December 20, 2024

/

तब्बल 160 वेळा रक्ताचे महादान

 belgaum

रक्तदानाचे महत्व काय ?साधा एकादा अपघात झाला ,डिलिवरी झाली ,कोण आजारी पडलं, तरच समजते हे महत्व. रक्ताची गरज लागतेच.  रक्त कुठे बाजारात विकत मिळत नाही काय कुठे फॅक्टरीत तयार होत नाही  त्यामुळेच  समाज सेवेचा ध्यास मनात  आणत रक्तदान करायला सुरुवात केली.. आतापर्यंत  जवळपास 160 वेळा रक्तदान केलेलं आहे त्यांचं नाव आहे विनायक धाकलुचे(देसाई) .

आज राष्ट्रीय रक्तदान दिवस त्या निमित्ताने आज आम्ही या रक्तदात्याची माहिती देत आहोत.वय 55 वर्ष असलं तरी अजूनही वर्षातून पाच ते सहा वेळा रक्तदान करत असतात .राष्ट्रीय रक्तदान दिना निमित्य त्यांनी महावीर ब्लड बँक मध्ये जाऊन रक्तदान केलं आहे. त्यांनी 18 व्या वर्षी रक्तदान करायला सुरू केलय आता पर्यत हा आकडा 160 पर्यंत गेला आहे  हे रक्तदान आपण एकटेच न करता इतरांनाही प्रेरणा देत श्रीकांत पाटील आणि सोबतीच्यानीही अनेकदा रक्तदान करायला लावले आहे.

विनायक अनगोळ येथील विध्या नगर येथे राहतात भाजप चे कट्टर कार्यकर्ते असून आर एस एस चे कार्य करत असतात. आपल्या आयुष्यात 160 वेळा रक्तदान करून साऱ्या बेळगावकरासमोर  आदर्श निर्माण केलेले  विनायक यांच्या कार्याचा अनेक संघ संस्थानी सत्कार केला आहे. गेल्या वर्षी कंकनवाडी आयुर्वेद महाविध्यालात,के एल ई शतक महोत्सव कार्यक्रमात लायन्स क्लब च्या वतीनं ,अनगोळ शिवनेरी युवक मंडळान त्यांचा सत्कार  केलाय.अशा या रक्तदात्याच्या कार्यास बेळगाव live कडून शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.