मराठी विद्यानिकेतन (ज्योती कॉलेज) च्या मैदानावर शनिवारी ता 30 रोजी सायंकाळी भव्य प्रमाणात दसरा उत्सव सीमोल्लंघन साजरा झाला, यावेळी कुटुंबासमवेत हा सोनं लुटण्याच्या कार्यक्रमानंतर भेळ, भेळपुरी,पाणीपुरी,भडंग, आलीपाक,आईस्क्रीम, खाऊन जी रद्दी ,प्लास्टिक पिशव्या, बसण्यासाठी मोठया प्रमाणात घरातून येताना आणलेली पेपर रद्दी, एकत्र करण्यासाठी जायंट्स मेन च्या मध्यमातून मैदानावर ठिकठिकाणी कचरा निर्मूलनासाठी मोठे बॉक्स ठेवले होते, व या कचरा पेटीचा उपयोग करा, व मैदानाची स्वच्छता राखा, असे आवाहन फिरत्या ध्वनिक्षेपकावरून आवाहन करीत होते, यासाठी मदन बामणे, महेश शहापुरकर, अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष अशोक हलगेकर, सुनील भोसले, सुनील मुतगेकर, लक्ष्मण शिंदे, सुधीर पाटील, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, भाऊ किल्लेकर, दिगंबर किल्लेकर, राजू बांदिवडेकर, यांनी केले, यावेळी उपस्थित जनतेनेही सहकार्य केले, आणि या कचरा पेटीचा उपयोग करीत आपण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर उरलेला कचरा या कचरा पेटीत टाकून आपणही जायंट्स मेन च्या स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन सहकार्य केले, याबद्दल जनतेचेही आभार मानण्यात आले.
Trending Now
जायंटस सदस्यांचे अभिनंदन