Friday, April 19, 2024

/

काँग्रेस फेरबदलाच्या वाटेवर- वाचा जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांचा लेख

 belgaum

Prashant bardeनोट बंदी व जी एस टी मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी  होत चालल्यानेच काय इंदिरा काँग्रेस मधील संघटनात्मक बदल होण्यास वेग आला आहे त्यामुळेच अखिल भारतीय  काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे

काँग्रेस चे अध्यक्षपद राहुल गांधी यांना ध्यावे की प्रियंका गांधी यांची नियुक्ती व्हावी याबद्दल खुद्द काँग्रेस पक्षातच भिन्न मतप्रवाह आहेत मात्र अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या इच्छेमुळेच राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाची सूत्रं असावी असा आग्रह सोनिया गांधी  धरल्याने राहुल यांचीच निवड व्हायची शक्यता वाढली आहे तर राहुल गांधी यांचे उपाध्यक्ष पद लोकसभेतील काँग्रेसचे गट नेते व माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे.अलीकडेच देशात राष्ट्रपती पदाच्या झालेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या रामनाथ कोविंद या दलित वर्गातील व्यक्तीला देशाचे सर्वोच्य पद भाजपने बहाल करून आपली दलित वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याचाच एक प्रकारे काँग्रेसने अनुकरण केलं आहे.

नव्या पिढीला संधी देण्याचा उद्देशाने  माजी केंद्रीय मंत्री कै माधवराव सिंदिया यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य सिंदिया यांना लोकसभेचे गट नेते हे मोठं पद देण्याच निश्चित केल जात आहे.ज्योतिरादित्य यांची लोकसभेतील चांगली कामगिरी पाहूनच त्यांना ही भेट देण्यात येण्याचे मानले जात आहे . तर दुसरीकडे पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून  प्रियंका गांधी यांचीच निवड होण्याची शक्यता अधिक आहे.

 belgaum

पुढील वर्षी कर्नाटक गुजरात सह अन्य राज्यात होणाऱ्या  निवडणुकांकडे सत्ताधारी भाजप सह सर्वच राजकीय पक्षांच लक्ष लागून राहील आहे त्यामुळं काँग्रेस देखील पक्ष नेतृत्वात बदलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.गेल्या दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातील काँग्रेस मध्ये फार मोठे अंतर्गत वाद होते ते वाद सोडवून कर्नाटक काँग्रेस एकसंघ करण्यासाठी राहुल गांधींचे विश्वासू सहकारी केरळचे खासदार एम के वेणूगोपाल यांना कर्नाटकात धाडून  हे मतभेद दूर करण्याच काम त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल आहे त्यामुळं त्यांनीच कर्नाटक काँग्रेसला एक प्रकारे संजीवनी दिली असल्याचं मानलं जातं आहे त्यामुळेच सिद्धरामय्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल असा दावा करत आहेत.

अलीकडेच काँग्रेसचे जेष्ठ नेते वीरान्ना मतीकट्टी  यांनी बेळगाव जिल्ह्यातील जारकीहोळी बंधुतील राजकीय मतभेद दोघांना एकत्रित बसवून दूर केल्याने बेळगावातही  काँग्रेस मुसंडी मारील  असाच राजकीय निरीक्षकांचा होरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.