Sunday, January 5, 2025

/

भीती वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobatसंवेदनशीलता हे एक चांगले व्यक्तिवैशिष्ट्य असू शकते. परंतु अति संवेदनशीलता हा एक मनोविकारसुध्दा असतो. काही व्यक्ती जन्मतःच भावुक असतात.
नंदिता अतिशय हुषार. बोलघेवडी तेवढीच इमोशनल सुध्दा. अशा नंदिताचं लग्न झालं. सासरची मंडळी अतिशय कडक. सगळ्यांचे चेहरेसुध्दा कडक इस्त्री केल्यासारखे. सासूबाईंना वायफळ बोललेलेही आवडायचे नाही. सासरेबुवा हसलेले कुणी पाहिलेच नव्हते. माहेरी मनमोकळ्या तरीही सुसंस्कृत वातावरणात वाढलेली नंदिता कोमेजुन गेली. सततच्या दडपणातून नंदिता एकदम अबोल होऊन गेली. अनामिक भीतीमुळे, सततच्या टेन्शनमुळे तिला गॅस्ट्राईसचा त्रास होऊ लागला. पोटात अतिशय दुखत असे. भूक खूप लागायची परंतु खाल्लं की उलट्या, मळमळ व्हायची. बेचैनी व्हायची. एन्डोस्कोपीमध्ये ग्रॅस्ट्राइट्सचे निदान झाले.
काही सूचक प्रश्‍न विचारल्यावर नंदिताने आपणहून तिला कशामुळे त्रास होतो ते सांगितलं. तिच्या मनाची घुसमट, घरच्यांची भीती यामुळे पोटातील ऍसिडचे सिक्रीश जास्त होऊन ग्रॅस्टाईट्सचा त्रास होत असे. औषध दिल्यावर नंदितामध्ये आपोंआपच फरक पडत गेला. समोरचे माणूस बदलणारे नसले तर स्वतःच बदलायला हवे हे आत्मज्ञान तिला झाले. बस! ग्रॅस्टाईट्स छू मंतर.
होमिओपॅथीने प्रथम मानवी स्वभावाचा अभ्यास करायला शिकवल्याने रूग्णांचे चेहरेसुध्दा व्यवस्थित वाचता येतात. अर्थात पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवसिध्द प्रॅक्टीससिध्द ज्ञान फार महत्वाचे.

भीती वाटणे- यातील भीती कशाचीही असू शकते. अंधाराची भीती, माणसांची भीती, उंचीची भीती, शिक्षकांची भीती, अभ्यासाची भीती, बॉसची भीती, प्राण्यांची भीती, मृत्यूची भीती, अशी भीती आणि तशी भीती!
भीतीमुळे काय होते?- शरीरातील ’ऍड्रीनलीन’मुळे व्यक्ती सतत तणावजन्य परिस्थितीमध्ये राहते. छातीचे ठोके जलद होतात. रक्तदाब वाढतो. जठरामधील आम्लाचे प्रमाण वाढून पोटात वात होतो. मानसिक दडपण वाढत जाते. त्यामुळे हृदयावर, मेंदूवर अनिष्ट परिणाम होतात.

भीतीवर नियंत्रण कसे मिळवावे?-
१. स्वयंसूचना- आपणाला भीती वाटणार नाही, मी कशालाही घाबरणार नाही. अशा सूचना स्वतःच स्वतःला देत राहिल्याने आत्मविश्‍वास येतो.
२. योगसाधना- प्राणायम, शवासन, स्वयंसमोहन याव्दारे लाभ होऊ शकतो.
३. पुष्पौषधी- अज्ञाताची भीती, ठराविक कारणास्तव वाटणारी भीती, भीतीने थिजून जाणे, भीतीमुळे बेशुध्द पडणे यावर ऍस्पेन, मिम्युलस, रॉकरोज आणि रेस्न्यू अशी औषधे आहेत.
होमिओपॅथी- भीतीवर होमिओपॅथीमध्ये उत्कृष्ट उपचार आहेत. भीतीमुळे उत्पन्न झालेल्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा पूर्णतः अभ्यास करून असे उपचार केल्यास अंधाराची, एकटेपणाची, शाळेची, इतर व्यक्तींची, जनावरांची कीटकांची, परीक्षेची, मुलाखतीची, भाषण करण्याची, व्यासपीठावर जाण्याची अगदी मृत्यूची भीतीदेखील संपुष्टात येते.

 

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 0831-2431362
सरनोबत क्लिनिक-0831 2431364

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.