ट्रॅकिंग साठी जंगलात गेलेल्या रस्ता भटकलेल्या मुलीना शोधण्यात बेळगाव वन खात्याला यश आले आहे. सोमवारी सात मुलीसह एक अनाधिकृत गाईड चोरला गोवा येथील जंगलात पायपीट करण्यासाठी गेले होते घनदाट जंगलात रस्ता भटकलेल्या मुलीना कणकुंबी जंगलात बेळगाव वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी शोधून काढला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलींची टीम अनधिकृत गाईड आणि त्या मुलींच्या पालकासह वन खात्याच्या परवानगी शिवाय सोमवारी ट्रॅकिंग च निमित्य करून जंगलात दाखल झाले होते. सोमवारी सायंकाळ पर्यंत ट्रॅकिंग ला गेलेली टीम वापस न आल्याने त्यांच्या नातलगांनी गोवा पोलीस आणि वन विभागास माहिती दिली होती त्यानुसार गोवा प्रशासनाने बेळगाव वन विभागास यांची कल्पना दिली त्यानुसार दोन्ही राज्यांच्या वतीने संयुक्त शोध मोहीम राबविण्यात आली होती.बेळगाव वन खात्याच्या टीम ने पोलिसांच्या साहाय्याने कनकुंबी चोरला घाटातून गोवा सीमेच्या दिशेने शोध मोहीम सुरू केली होती.मंगळवारी सकाळी बेळगावच्या टीम ने गोवा येथील जंगलात त्या रस्ता भटकलेल्या त्या मुलींचा शोध लावला जंगलातून सुखरूप बाहेर काढले.
ट्रॅकिंग ल गेलेल्या टीम मध्ये डेब्रा गोंचालवीस वय 13, सायरी फर्नांडिस वय 12,पर्ल फर्नांडिस वय 12,स्वेटलाना गोम्स वय 12, निवासी रिबांदर तर संशा संपायो 11,साईना डिसोझा 12,आणि सियांना डिसोझा निवासी पर्वरी आणि तीन मुलींचे पालक देखील सोबत होते. हे सर्व ट्रेकर्स
म्हादाई रिसर्च सेंटर च्या जंगलातून सोमवारी
दुपारी जंगलात दाखल झाले होते मुसळधार पावसामुळं आणि झाडातील अंधारामुळे ते जंगलात रस्ता भटकले होते.डी एफ ओ बसवराज पाटील यांच्या नेतृत्वात ए सी एफ सी बी पाटील आर एफ ओ एस एस निंगनी आदी सहकाऱ्यांनी जंगलात प्रवेश करून रस्ता भटकलेल्या टीमने जंगलातून सुखरूप बाहेर काढले.
गोवा किंवा कर्नाटक दोन्ही पैकी कुणाचीही परवानगी न घेता जंगलात प्रवेश केलेल्या ट्रेकर्स वर गुन्हा नोंद केला आहे