Saturday, May 4, 2024

/

देवेगौडा बेळगावला येणार

 belgaum

आपले ज्येष्ठ सहकारी असलेल्या रामभाऊ पोतदारांना अखेरचा निरोप देण्यासाठी माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आज बेळगावला येणार आहेत.
त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच गौडा यांना अतीव दुःख झाले आहे. आपले एक जुने सहकारी आणि मार्गदर्शक हरपले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आपण स्वतः उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवाला वंदन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
देवेगौडा आणि पोतदार हे जुने स्नेही आहेत. ते पंतप्रधान असताना त्यांनी त्यांना राज्यपाल करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता.
देवेगौडा यांच्या बरोबर त्यांचे पुत्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामीही अंत्यविधीला येणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.