बांधकाम नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव सभागृहात चर्चा न करता नगर विकास खात्याकडे पाठविला जातो शहरातील बांधकाम व्यावसायिकांना फायदा करून देण्यासाठी हा प्रस्ताव पारित केला जातो का? बिल्डर लॉबी ला खुश करण्यासाठी अधिकारी हे कृत्य करत आहेत का ? का आमदार आणि बिल्डर उपस्थित असलेल्या या बैठकीस पालिका अधिकाऱ्यांनी सभागृहास न कळवता बैठकीस हजेरी लावावी असे अनेक प्रश्न उपस्थित करत जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक, दीपक जमखंडी आणि गट नेते पंढरी परब यांनी पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गुरुवारी पालिकेची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा चांगलीच झडती घेतली यावर आमदारांच्या दबावाखाली वागत असलेले अधिकारी समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. यावेळी सामान्य माणसाना परवानगी मिळवण्यास होत असलेले त्रास व्यक्त केले परवानगी नियम शिथिल करा अशी देखील मागणी करण्यात आली .
नैवेध्यम समरपयामी
नगरसेविका सरला हेरेकर यांनी तर अधिकाऱ्यांना टेबला वरून इंवा टेबला खालून नैवेद्य दिल्या शिवाय इमारत परवानगी किंवा कोणतेही काम अधिकारी करत नाहीत असा थेट आरोप करून टाकला नैवेधम समर्पयामी मध्येच अधिक तरबेज आहेत असे देखील त्या म्हणाल्या.
शहरातील रस्त्याला किंवा वास्तुस भीमराव गस्तीचं नाव ध्या –
आपलं साहित्य आणि समाजसेवा कार्यातून बेरड समाजाच्या विकास उन्नती साठी कार्य करणारे,देवदासी मुलींच्या शिक्षणासाठी योगदान दिलेले कै भीमराव गस्ती यांना महा पालिकेतील सर्वसाधारण सभेत श्रद्धांजली वाहिली.दोन मिनिटं मौन पाळून सर्व सदस्यांनी भीमराव गस्ती माजी मुख्यमंत्री एन धरमसिंह, नगरसेविकासरला हेरेकर यांचे पती शिवानंद हेरेकर यांना देखील श्रद्धांजली वाहिली.
विरोधी गट नेते दीपक जमखंडी यांनी भीमराव गस्ती यांच नाव शहरातील कोणतीही वास्तू किंवा रस्त्यास नाव द्या अशी मागणी केली त्याला जेष्ठ नगरसेवक किरण सायनाक यांनी अनुमोदन दिल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उप राष्ट्रपती वेन्कैय्या नायडू यांचा अभिनंदनाचा ठराव देखील मांडण्यात आला.