रविवारी रात्री होलसेल भाजी मार्केट मधील दोन दुकानांना आग लागुन दोन्ही दुकान जळून खाक झाली आहेत.रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही आग लागली होती सुरुवातीला सदानंद एच एस पाटील यांच्या दुकानास
लागली होती हळूहळू पसरून सुरेश होनगेकर यांच्या दुकानास लागली होती.अग्निशामक दलाच्या गाडयाना बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न झाला मात्र तोपर्यंत दोन्ही दुकानातील साहित्य आगीत जुळून खाक झालं होतं.
दोन्ही दुकानात कोट्यवधी रुपयांचा टर्न ओव्हर असलेलं दप्तर दुकानांची खाती बॅलन्स शीट जळून खाक झाली आहेत. या प्रकरणी सोमवार दुपार पर्यंत देखील मार्केट पोलिसात तक्रार नोंद झाली नव्हती. बेळगाव live ने पोलिसांशी संपर्क साधला असता या घटने बाबत पोलीस देखील अनभिज्ञ होते.
नेमकं कारण काय?
आग शॉर्ट सर्किट मुळे लागली की याला आणखी काही कारण आहे याबद्दल भाजी मार्केट मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.
नवीन भाजी मार्केट बांधण्यात येत आहे यावरून भाजी मार्केट व्यापाऱ्यात गट पडले आहेत त्या वादातून ही घटना घडली आहे की काय अशी देखील चर्चा मार्केट मध्ये ऐकावयास मिळत आहे