Saturday, April 27, 2024

/

मराठा रेजिमेंटल सेंटरच्या जवानांच रक्षा बंधन

 belgaum

रक्षा बंधन हे भाऊ बहिणीचे अतूट नाते सांगणारा सण आहे देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानाना राखी बांधून त्यांच्यादीर्घायुष्य साठी प्रार्थना बेळगाव  येथील मराठा इंफट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये करण्यात आली .  चंदगड  तालुक्यातील हलकर्णी येथील यशवन्तराव चव्हाण कॉलेज तसच के एल एस शाळेच्या चिमुकल्या विध्यार्थिनीनी  जवानांना राखी बांधून हा सण साजरा केला.KLsआपले घर दार सोडून देश सेवा करण्यासाठी सीमेवर  वाहून  घेतलेय जवानांना गेल्या अनेक वर्षा पासून चंदगड   तालुक्यातील हलकर्णी महाविध्यालायाच्या विध्यार्थिनी  आणि बेळगावातील के एल एस शाळेच्या चिमुकल्या विध्यार्थिनी राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्य साठी प्रार्थना केली या वर्षी सुद्धा  त्यांनी  बेळगाव मराठा   मराठा  सेन्टरच्या जवानांना राखी बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना  केली आहे.

यावेळी मराठा सेंटर चे कॅप्टन रॉबिन इब्राहिम ,सुभेदार मेजर उत्तम शिंदे, सुभेदार मेजर सुनील शिंदे यांच्यासह अन्य प्रशिक्षित जवान, मराठा सेंटर अधिकारी उपस्थित होते.Halkrani collegeमराठा  सेन्टरच्या क्वाटर गार्ड मध्ये आयोजित सेनेच्या जवानाना राखी बंधन केल्या नंतर जवानांनी  सुद्धा  देश आणि मात बहिणीचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध  असल्याची भावना  बोलावून दाखविली आहे . जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तान  कडून निरंतर होणार्या गोळीबार नंतर जवानांना आपल्या घरातील मंडळीची कमतरता होवू नये या  साठीचा हे रक्षा बंधन कार्यक्रम जवानांना प्रोत्साहन देणारा आहे . KLs raksha bandhanदेशाच्या रक्षणा  साठी सज्ज असलेल्या या जवानांना राखी बांधण्याच्या उपक्रम म्हणजे  जवानाना  देश रक्षणा साठी  आपल्या  कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.