अकारण नैराश्य येणे म्हणजे कोणतेही कारण नसताना मन निराश होऊन हूरहूर लागणे, अस्वस्थ होणे, मन उदास होणे, यालाच विषण्णता किंवा ’मेलंकोलीया’ असं म्हटलं जातं.
कित्येकदा तर असं होतं की आपल्या मनाची आनंद घेण्याची वृत्ती काम करेनाशी होते. कितीही सुंदर, मनोहर, सुखकारक असले तरी मन प्रसन्न नसते. मग ’आहे मनोहर तरी गमते उदास!’ असेच वाटू लागते. आनंद, प्रसननता ही वृत्ती मुद्दाम तयार करण्याची आपल्या मनाला सवय लावून घ्यायला हवी. असे झाले नाही तर आनंद निर्माण होण्याची आपल्या मनाची क्षमता हळुहळू नष्ट होऊन जाते. वातावरण, आयुष्य रूक्ष बनून जाते.
अकारण येणारी उदासिनता निवारण करण्यासाठी पुष्पौषधींचा उपयोग होतो. पुष्पौघधी म्हणजे बाख रेमीडीज या भारतीय नसून युरोपियन आहेत. डॉ. बाख यांच्या सिध्दांतानुसार निसर्गातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रोग्रॅमप्रमाणे पूर्णत्वाकडे जाण्याच्या प्रक्रियेमध्ये काही देाष निर्माण झाला तर तेथील प्रवाह खंडित होतो. कुंठीत होतो. त्यामुळे (ऊळी- शरीश) अस्वास्थ निर्माण होते. पुष्पौषधीच्या उर्जास्पंदनामुळे (तळलीरींेीी- शपशीसू) खुंटलेला प्रवाह सुरू होण्याची प्रक्रिया सुरू होते व स्वास्थ मिळते.
आमची एक डॉक्टर भगिनी आहे, तिलासुध्दा असाच त्रास व्हायचा. कमालीची हुशार, छान चाललेली प्रॅक्टीस, उमद्या स्वभावाचे डॉक्टरपती दोन गोजीरवाणी मुलं. समग्र सुखं हात जोडून उभी! असं असूनही या मैत्रिणीला विषण्णतेचा त्रास होऊ लागला. डोळ्याखाली काळी वर्तुळं, कशातही रस वाटत नाही. जेवावंसं वाटत नाही, टी. व्ही सुध्दा बघावा वाटत नाही. मुलांशी गप्पागोष्टी नाहीत, आपल्या हृदयातील आनंद घेण्याची व आनंद देण्याची क्षमता आटल्याची भावना. त्यांना होमिाओपॅथिक औषधं व बाख रेमिडीज (पुष्पौषधी) चा पुष्कळ फायदा झाला. मला वाटतं अशा प्रकारची अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. जीवनाचा फोलपणा आणि आपल्या अपेखा, आकांक्षा जरा काठावर उभे राहून अनुभवण्याचा हाच काळ असावा. स्वतःची ओळख पटण्यासाठी या काळाचा चांगलाच फायदा होतो. पण या विषण्णतेतून बाहेर यायला हवे. नाहीतर तीव्र नैराश्येचा (डिप्रेशन) झटका येतो. यामध्ये भावनिक चढउतार होऊ लागतात. म्हणजे नैराश्य आणि उन्माद! यालाच बायपोलार डिप्रेशन म्हणतात. काही दिवस अति उत्साहात जातात. खूप बोलावे, खूप खावे, खूप मजा करावी, असे वाटते. कधी कधी अति उत्साहाची ही स्थिती नियंत्रणाबाहेरही जाते. त्याच्या पुढचा काळ हा नैराश्याचा असतो. सारखी भांडणं काढणे, सुन्न बसून राहणे, जेवणा खाण्यावरची वासना उडणे असे प्रकार होतात. शारीरिक व्याधींमध्ये मलावरोध (शौचास साफ न होणे), अंगदुखी, निरूत्साह, मरगळ, पित्त इत्यादी त्रास होतात. ज्यांना निराशेच्या तीव्र भावनांनी घेरलेले असते त्यांचे शरीर गार वाटते. रक्तदाब खाली जातो, भावनांचे आवेग येऊन उकडते तर कधी थंडी वाजते. चिंता करणे आणि मनावरील ताण या दोन गोष्टी दीर्घ काळ चालू राहिल्या तर मनाचे नैराश्य वाढते.
उपचार- आहार उपचार- नैराश्याने त्रस्त रूग्णांनी आहारात सफरचंद, काजू, शतावरी, वेलदोडा, हिरव्या भाज्या, अंडी, मासे यांचा समावेश करावा. विशेषतः मोड आलेले मूग व ताक यांचा जेवणात अंतर्भाव असावा.
व्यायाम- प्राणायाम, भस्रिका, भ्रामरी, अनुलोकविलोम यांचा अवलंब करावा.
पुष्पौषधी व होमिओपृथी- जाणकार तज्ज्ञांकडून पुष्पौषधी व होमिओपॅथिक औषधे घ्यावीत. त्यामुळे दुष्परिणाम विरहित मानसिक आरोग्य पुनश्च मिळवता येते.
डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४
Great work going on from u
very nice ….Sonaliji….best wishes ….
Nice