Sunday, December 22, 2024

/

आभास आणि भास-डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobatमनाचे खेळ मोठे विचित्र असतात. माणसाचे मन ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. काहीवेळेस ही शक्ती काही अव्दितीय निर्माण करणारी असते तर कधी विघातक संहारक असू शकते. भास आणि आभास हे ही असेच मनाचे खेळ असतात.
आभास- अवास्तव जाणीव होणे म्हणजे आभास होय. एखादी व्यक्ती नसताना असल्याची जाणीव होणे एखादा गंध, वास, हालचाल जाणवणे, कोणीतरी हाक मारत  आहे, बोलवत आहे. फोनची रिंग वाजत आहे. डोअरबेल वाजत आहे. असा आभास होतो. जवळ जवळ सर्व व्यक्तींना कधी कधी असा आभास जाणवू शकतो. थकवा, जागरण, प्रदीर्घ आजारानंतरचा अशक्तपणा यामध्ये अशी जाणीव होऊ शकते. आभासासाठी जास्त उपचारांची आवश्यकता भासत नाही. काही साध्या होमिओपॅथिक उपचारांनी हा विकार बरा होतो.
भास- मेंदूचे संदेशवहन उलटसुलट झाल्याने भास होतात. झोपेच्या प्रथम व अंतिम चरणामध्ये इल्युजन व हाल्युसिनेशनची सुरूवात होते. नंतर जागेपणी (जागृतावस्थेत) सुध्दा भास होऊ शकतात झोपेत अंग काढणे, वाचा गेल्याची भीती वाटणे, दरदरून घाम फुटणे अशी सुरूवात होऊ शकते. स्थळकाळाची, वेळेची जाणीव पुसट होऊन मनाचा गोंधळ उडतो. मेंदूच्या पेशींच्या संदेशवहनात व जैविक घड्याळाच्या कामात अडथळा आल्यामुळे असे प्रकार होतात. मेंदूला इजा होणे, मस्तिष्क दाह (मेलिंजायटीस), मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा व साखरेचा पुरवठा कमी झाल्यानेसुध्दा असा त्रास होऊ शकतो. डिहाड्रेशनमध्ये रक्तातील क्षार कमी झाल्यानेसुध्दा भास होऊ शकतात. काही औषधांच्या दुष्परिणामाने मादक अमली पदार्थांमुळे (चरस, गांजा, भांग) भास होतात.
भास होणे ही एक गंभीर समस्या असून यावर ताबडतोब उपाय करणे आवश्यक असते. पुष्पौषधी व होमिओपॅथी यांच्या संयुक्त उपचारांनी हा विकार बरा करता येतो.

भास हे निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. हिडीस, वाईट चेहरे दिसणे, हसण्याचे चित्रविचित्र आवाज ऐकून येणे, पाण्याचा खळखळाट ऐकू येणे, कोणीतरी आपल्याला आत्महत्या कर असा आदेश देत आहे, असे वाटणे, देव व भूत आपल्याशी बोलंत आहेत असे वाटणे आजूबाजूला विचित्र किडे, प्राणी दिसणे, साप बिछान्यावर रेंगत आहेत असे वाटणे, विचित्र प्रकाश दिसणे, सगळीकडे घाण- विष्ठा भरली आहे, असे वाटणे, कपडे घाणीने भरल्यासारखे वाटणे इ. इ. व्यक्तीनुसार भासाचा प्रकार व तीव्रताही बदलत जाते. असे भास होणार्‍या व्यक्तीला तो भास होता हेच मुळी कळत नाही. अशा व्यक्तीच्या संपर्कात असणार्‍या व्यक्तींनीच ते ओळखून उपचार केले पाहिजेत.
भ्रम- विभ्रम- ऊशश्रशीर्ळीा | ारपळर मोठया आजारामध्ये विशेषतः मेंदूज्वर, टायफॉईड खूप येणारा मेंदूला चढणारा ताप, अल्कोहोल विदड्रॉवल (दारू अचानक सोडणे) यामुळे भ्रम व्हायला लागतो किंवा मेंदूच्या विशिष्ठ भागाला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळेदेखील भ्रम- विभ्रम होऊ लागतात. तारूण्यातील मोहक विभ्रम वेगळे आणि विभ्रम वेगळे हे सुज्ञान सांगणे नकोच. अतिशय दारू पिणार्‍या व्यक्तीने अकस्मात दारू सोडली तर त्याची चळ लागल्यासारखी अवस्था होते. त्याला डिलीरियम ट्रिमेन्स म्हणतात. अशा व्यक्तींना इतस्ततः किटक उंदीर, साप दिसतात. प्रचंड भीती वाटते. उलघाल होते. हा विकार मेंदूला चढून फिट्स येऊ शकतात. वेळेत उपचार झाले नाहीत तर रूग्ण दगावू शकतो. दारू सोडण्यासाठी प्रचंड मनोनिग्रह, डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक असतो. पण या कारणाचा उपयोग दारू पिण्याचा परवाना म्हणून करू नये.
भास- अभास- भ्रम- विभ्रम हे मनाचे विकार दैनंदिन आयुष्य कठीण करून टाकतात. साधे सोपे आनंदमयी जीवनही दुर्लभ होते. त्यासाठी होमिओपॅथी सारखे दुसरे उपचार नाहीत. जोडीला पुष्पौषधी असतील तर पूर्णतः निरोगी मन पुनश्‍च मिळू शकते.

डॉ सोनाली सरनोबत
केदार क्लिनिक 0831-2431362
सरनोबत क्लिनिक-0831 2431364

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.