चिकोडी तालुक्यातील नेज येथे धारधार शस्त्राने गळा कापून तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे महेश पुजारी वय 25, असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री महेश हा आपल्या बाईकने जात असताना काही अज्ञातानी मिरची पूड फेकून हल्ला केला यावेळी महेश याच्या मानेवर इतर ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला आहे
काही नागरिकाना घटनास्थळी पडलेला मृतदेह व बाईक
आढळल्यानंतर सकाळी घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती कळताच चिकोडी डीवाएसपी बी एस अंगडी, सीपीआय मलनगौडा नायकर, पीएसआय संगमेश दिडीगनाळ आदींनी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर दुपारी बेळगाव अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडदे यांनी भेट दिली याप्रकरणी दोन संशयीताना ताब्यांत घेण्यात आले आहे याप्रकरणामुळे नेजसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.