Friday, April 26, 2024

/

नाला वळवून कस उभारलं अपार्टमेंट- बघा बेळगाव live कडचे पुरावे

 belgaum

कश्या पद्धतीने जाधवनगर येथे नाला वळवून अपार्टमेंट बांधल गेलय बेळगाव live कडे आहेत सबळ पुरावे ,

bhrashtachar

नाल्याची दिशा कशी बदलली गेली अधिकाऱ्यांना हाताशी धरून  seven construction कंपनीने उभारले आहे अपार्टमेंट .. हा नाला  सर्व सामान्य जनतेला उपयोगाचा असताना नैसर्गिक पाणलोट झरे असणारा  जुन्या सी डी पी मध्ये नोंद असलेला प्रत्यक्ष जागेत असलेला नाला गायब करून अपार्टमेंट उभारण्यात आला आहे.

 belgaum

आर टी आय कार्यकर्ता श्रीनिवास राव यांनी हे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले आहे . स्वताला व्हाइट कॉलर आणि प्रामाणिक समजणाऱ्या एका आमदाराच्या कंपनीने हे भ्रष्ट कार्य केल आहे . मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्याना दिले आहेत . या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक अधिकारी  लोक प्रतिनिधी अडकणार आहेत . बेळगाव live कडे नाल्याची दिशा वळवून अपार्टमेंट बांधलेले पुरावे उपलब्ध आहे.

भ्रष्टाचार निर्मुलन परिवारची मागणी

सरकारी नाला वळवून स्वताच्या मालकीचे अपार्टमेंट बांधणाऱ्या लोक प्रतिनिधीला गजाआड करा या प्रकरणात कोणते अधिकारी गुंतले आहेत त्यांच्यावर आधी निलंबनाची कारवाई करा नंतर चौकशी करा अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराने केली आहे.

निवासी जिल्हाधिकारी सुरेश  इटनाळ यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे . यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन परिवारचे अध्यक्ष सुजित मुळगुंद ,भाजप नेते शशिकांत नाईक, माजी भाजप आमदार मनोहर कडोलकर ,माजी महापौर शिवाजी सुंठकर ,कार्मिक संघटना अध्यक्ष एन आर लातूर उपस्थित होते .nala incrochment 1

(याच जागेवर लाल मार्किंग मध्ये नाला अतिक्रमण करून अपार्टमेंट बाधण्यात आले आहे )

nala incrochment 2

( हा सी डी पी प्लान आहे लाल मार्किंग मध्ये दाखवलेली जागेवर सी डी पी मध्ये हिरव्या रंगाचा ज पट्टा दिसतो तो नाला आहे )

nala incrochment 3

( सजीव नाला आणि नाल्यातील वाहते पाणी )

nala incrochment 4

(नाल्याची दिशा बदलून पहिला वळवलेला हा फोटो . याच जागेवरून नाला पहिला वळविला आहे )

nala incrochment 5

(नाल्याला दिलेलं तिसर वळण )

nala incrochment 6

( नाल्याला दिलेलं चौथ वळण )

nala incrochment 7

( नाल्याला दिलेलं पाचव वळण )

nala incrochment 8

( अपार्टमेंट च्या मधोमध नाल्याच रूप पाईप मध्ये रुपांतर केलेलं आहे  याचा सबळ पुरावा )

nala incrochment 9

इमारतीच्या उत्तर भागातून मधोमध गेलेली नाल्याची ठिकाणी घातलेली पाईप

nala incrochment 10

( सी डी पी मधील नाल्याचा नकाशा )

nala incrochment 11

( उपग्रहाद्वारे घेतलेल्या चित्रात देखील नाल्याची नोंद आहे त्याचा हा नकाशा )dc order

( मुख्यमंत्र्यांच्या आदेश वरून जिल्हधिकार्यांनी १५ दिवसाच्या आत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिलेली प्रत )

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.