Wednesday, December 25, 2024

/

नियती फौंडेशन तर्फे मिशन नो सुसाईड…

 belgaum

आज येथील ट्रिनिटी कॉलेज मध्ये नियती फौंडेशन तर्फे ‘मिशन नो सुसाईड’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून जितेंद्र भिडे व नियतीच्या अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. सर्वाना काही न काही प्रॉब्लेम असतात,पण त्यापासून पळून न जाता परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे,असे वक्त्यांनी सांगितले.आजचा विद्यार्थी मनमोकळे पणाने पालकांशी बोलत नाही,भावनेच्या भरात किंवा कोणत्यातरी भीतीपोटी आत्महत्येसारखा मार्ग निवडतो.अशावेळी त्यांना जरुरी असते ती मार्गदर्शनाची.आपल्या मित्राशी पालकांशी मनमोकळे बोलले पाहिजे.
पालकांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट , त्याग आपण लक्षात घेतले पाहिजेत.विद्यार्थी सुद्धा खूप कष्ट करत असतो,काही वेळा यश मिळत नाही,पण प्रयत्न करत राहावे. अपयशाने खचून जाऊ नका तर परत प्रयत्न करा असे वक्त्यांनी संभोदित केले.कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवा व कोणतीही मदत लागल्यास नियती फौंडेशनला संपर्क करा असे आवाहन नियती तर्फे सीमा सोलापूर यांनी केले.
कॉलेजचे चेअरमन श्री आशुतोष डेव्हिड ,गीता नायडू ,व इतर प्राध्यापक उपस्थित होते.नियती फौंडेशन चे डॉ. समीर सरनोबत,संतोष ममदापुर, मोनाली शाह,सीमा सोलापूर,अमित देसुरकर,प्रसाद कुलकर्णी,किरण निपानी कर,कार्यक्रमाला उपस्थित होते.Niyati

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.