महाराष्ट्र राज्याच्या परिवहन विभागाने राज्यातील संपूर्ण बसेसवरती”जय महाराष्ट्र” हे वाक्य लिहिले आहे. असे वाक्य असलेल्या बसेस आज बेळगाव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या बस चालकांवर गुन्हे दाखल केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणे आणि सीमावासियांचा अपमान करणे, अस्मिता ठेचून काढणे हि कर्नाटक सरकारची भूमिका सातत्याने दिसत आली आहे. अशा कर्नाटक सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न शिवसेना आ.गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.
बसेस वरती काय वाक्य लिहिण्यात यावीत याचे प्रत्येक राज्याला स्वातंत्र्य आहे. हि अशी पहिली वेळ असले कि अशा प्रकारचे गुन्हे एका राज्याने दुसऱ्या राज्यावर दाखल करण्याचे असे हे आ.गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
केंद्र सरकारने याकडे तत्काळ लक्ष घालावे व या चालकांवर जे कर्नाटक सरकारने गुन्हे दाखल केले आहेत ते परत घेण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. तसेच महाराष्ट्र सरकारने या चालकांवर योग्य ती मदत करावी अशी विंनती मा.मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना करणार असल्याचे यावेळी आ.गोऱ्हे यांनी सांगितले.