मराठीचा द्वेष करण्यात कर्नाटकातील मंत्रीच आघाडीवर नाहीत तर स्वताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे कन्नड संघटनाच्या महिला पदाधिकाऱ्याना देखील मराठीची कावीळ झाली आहे हे आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या घटनेवरून दिसून येतंय.
निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष विलास गाडीवडडर यांच्या सरकारी वाहनाचा मराठी आणि कन्नड भाषेत लिहिलेला फलकच एका कन्नड संघटनेच्या महिला कार्यकर्तीने काढून घेतला आहे. कस्तुरी भावी अस या कन्नड संघटनेच्या महिला पदाधिकारीच नाव आहे .निपाणी नगराध्यक्ष विलास गाडीवडडर हे विकास कामांच्या बैठकीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते बैठक सुरु असताना त्यांचा निपाणी आमदार जोल्ले यांच्याशी विकास निधी वरून वाद झाला होता बैठक बैठकीतू ते बाहे पडताच कस्तुरी यांनी त्यांच्या गाडीवर कन्नड आणि मराठीत लिहिलेला नगराध्यक्ष नावाचा फलक काढून घेतला आणि आपलाकाडू शमवून घेतला. मंत्री रोशन बेग यांनी केलेल्या मराठी द्वेशाच्या वक्तव्य नंतर अश्या सामान्य कन्नड भाषिकांचा सुद्धा मराठी द्वेष उफाळून येत आहे .
बेळगाव सहा सीमा भागात भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार कानडी सोबत मराठीत सरकारी परी पत्रके देण्याचा कायदा आहे निपाणी महा पालिका कार्यक्षेत्रात ८० टक्के हुन अधिक मराठी भाषिक लोक राहतात मराठी कानडी दोन्ही भाषेत फलक होता तो काढून घेऊन महिला संघटनेने मराठी द्वेष दाखविला आहे .