Tuesday, April 30, 2024

/

हेवेदावे बाजूला सारून प्रश्नांसाठी कार्य करू-मराठी भाषिक युवा आघाडीस किणेकरांच आश्वासन

 belgaum

Madhyvrti mes meetingसर्व मराठी भाषिकांनी एकीकरण समितीच्या पाठीशी राहणे काळाची गरज आहे सामोपचाराने वैचारिक मतभेद बाजूला सारून पुढे जाऊ अश आश्वसन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मराठी भाषिक युवा आघाडीच्या शिष्ठ मंडळाला दिल.
मध्यवर्ती एकीकरण समितीच्या बैठकीत मराठी भाषिक युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना मध्यवर्ती समिती सापातनुकाची वागणूक दिली जाते याची कल्पना दिल्यावर बोलताना दिल आहे.
मध्यवर्ती समिती बैठकीवेळी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्याव अशी मागणी केली यावेळी कार्यकर्त्या सोबत चर्चा करावी की नको याबद्दल मालोजी अष्टेकर आणि प्रकाश मरगाळे यांच्यात थोडी शाब्दिक चकमक उडाली. शेवटी मालोजी अष्टेकर यांनी चर्चा कराच असा ठासून आग्रह धरल्यावर युवा आघाडीशी चर्चा करण्यात आली.

आमच्या दुहीच कारण पुढं करून बेळगावात कानडी वरवंटा फिरत आहे सगळे एकत्र आल्यास मराठी माणसाची कळ काढण्याची कुणाचीच टाप असणार नाही-कलुषित मन विसरून  स्वच्छ मनाने एकत्रित रित्या काम करू अश्या भावना माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.