डॉ. अंजलीताई निंबाळकर फौंडेशननी दोन वर्षांपूर्वी खानापूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत वॉटर प्रूफ दप्तरांचे वितरण केलं होत.आणि खानापुरातला पाऊस पाहता आशा दप्तरांची त्या विद्यार्थ्यांना आवश्यकता होती.
पण या वर्षी मराठा मंडळाच्या संचालकांची वक्रदृष्टी या दप्तरावर पडली आणि त्यांनी ही दप्तरे वापरण्यास मज्जाव केला हा तुघलकी कारभार कोणत्या राजकीय हेतूनं प्रेरीत आहे हे न समजण्याइतके खानापूरची जनता दुधखुळी राहिली नाही , भरमसाट फी आकारणे आणि दिल्या जाणाऱ्या कमी रक्कमेच्या पावत्या, हे या संस्थेचे वैशिष्ट्य होऊन बसले आहे गेल्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमच्या नावाखाली जो प्रकार घडवीला आणि खानापूर सारख्या दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्तीने वेगळ्या पद्धतीचे ड्रेस खरेदी करायला लावले आणि त्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनीना ससे होलपट करत मध्य रात्री खानापुरात या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले असा प्रकार ज्या संस्थेत चालतो त्यात संस्थेची या शालेय दप्तरा विषयी असणारी कटुता आणि असूया काय आहे हे समाजाला कळून चुकले आहे.
केवळ चमकोगेरी करणे, आपली तुंबडी भरून घेणे ही ज्याची नीतिमत्ता आहे त्याच्याकडून काय पालकांनी अपेक्षा करावी हा प्रश्न खानापूर तालुक्यात वणव्या सारख्या पसरत आहे