बेळगावातील सरकारी सिव्हिल हॉस्पिटल इमर्जन्सी वार्ड मधील शौचालय बघितलं तर सरकारी हॉस्पिटल मधील स्वच्छतेचे कसे तीन तेरा झालेआहेत याचा अंदाज येईल.
बेळगाव शहर स्मार्ट करण्यासाठी सगळीकडे स्वच्छता ठेवण्याचं आवाहन महा पालिकेवर शासनाकडे आहे मात्र सरकारी हॉस्पिटल टॉयलेट अवस्था बिकट आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी बाहेरून साफसफाई स्वच्छ करण्यात येत आहे खरोखर स्मार्ट बेळगाव करायचं असेल तर आतून देखील शहर स्वच्छ करायला हवं.
महापौर संज्योत बांदेकर यांनी देखील सरकारी सिव्हील हॉस्पिटल स्वछता ठेवा अशी सूचना डॉक्टर ना अधिकाऱ्याना केली होती तरी देखील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी याकडे लक्ष ध्याव अशी मागणी देखील केली जात आहे