Friday, April 26, 2024

/

परिपत्रिक मराठीत द्या अन्यथा आंदोलन-मध्यवर्तीचा इशारा

 belgaum

Mes bgmबेळगाव सह सीमा भागात 22 मे च्या आत भाषिक अल्पससंख्याक आयोगाच्या शिफारसी नुसार मराठी भाषेत सरकारी परी पत्रिके द्यावीत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा निर्णय मध्यवर्ती एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बुधवारी दुपारी मराठा मंदिरात बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं.अध्यक्षस्थानी नूतन अध्यक्ष दीपक दळवी उपस्थित होते.
यावेळी सीमाप्रश्नी साधक बाधक चर्चा झाली त्यानंतर सीमाभागातील जनतेला आपले अधिकार तसेच शेतकरी बंधूना भेडसावणार्या समस्या,शहरी भागातील जनतेला मास्टर प्लॅन,अन्यायी घरपट्टी, पाणीपट्टी,शिवजयंती काळात डॉल्बी दंड लावलेली मंडळ,कार्यकर्ते यांच्यावर घातलेले गन्हे मागे घ्या अशा व इतर भेडसावणार्या समस्या ताबडतोब सोडवा म्हणून मध्यवर्ती शिष्टमंडळ शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी एन जयराम यांची भेट घेऊन निवेदन देत यातील सर्व समस्या तत्पर सोडवा अन्यथा 22 मे रोजी भव्य असे आंदोलन करणार असा निर्धार करण्यात आला आहे.

यावेळी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर,सरचिटणीस मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,माजी आमदार दिगंबर पाटील,निंगोजी हुद्दार,तानाजी पाटील ,एल आय पाटील,सुरेश राजूकर,ईश्वर मुचंडी,राजू मरवे सह इतर बरेच मध्यवर्तीचे सदस्य हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.