Thursday, April 25, 2024

/

सरस्वती पाटलांचा मराठी आवाज

 belgaum

SAraswati patilबेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात सदस्या सरस्वती पाटील यांनी पुन्हा एकदा मराठी बाणा दाखविला आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा पंचायत बैठकीत आपल्या समस्या आणि म्हणणं मराठी आणि हिंदीत मांडून पुन्हा एकदा पूर्ण सभागृहाच लक्ष वेधून घेतलं आहे. सभागृहात सरस्वती पाटील यांच्या सह माधुरी हेगडे आणी जयराम देसाई यानीही आपल्या समस्या मांडल्या. बेळगाव तालुक्यातील आपल्या मतदार संघास कमी अनुदान मिळाला असल्याचा आरोप करत बेळगाव साठी विशेष बैठक बोलवा अशी मागणी सरस्वती पाटील यांनी यावेळी केली.
मागील काही दिवसात सरस्वती पाटील मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक बनल्या आहेत.एकीकडे 58 पैकी 32 मराठी नगरसेवकांची संख्याबळ असलेले मराठी नगरसेवक मराठी अस्मिता विसरत चालले आहेत तर दुसरीकडे 90 सदस्यांच्या जिल्हा पंचायत सभागृहात केवळ 5 मराठी सदस्य संख्या असूनही सरस्वती पाटील यांनी मराठी चा आग्रह धरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.