Saturday, July 27, 2024

/

यशाने हुरळू नका अपयशाने नका खचू

 belgaum

काल बारावीचा निकाल लागला, आज दहावीचा लागेल, कोणी यशस्वी होतील, बरेचसे अपयशीही होतील, दुसऱ्याला मिळाले तसे यश आपल्याला मिळेलच असे नाही, दुसऱ्याचा मुलगा किंवा मुलगी भरगोस यशाचे दावेदार असतीलही, म्हणून आपल्या कमी यशस्वी पाल्याला टोकू नका, हेच आजचे बेळगाव live चे आवाहन आहे.
भरपूर प्रयत्न केले म्हणून यश मिळाले असे असते आणि तसे काहिदा नसतेही, अपयश आलेल्यापैकी कुणी प्रयत्नच केले नव्हते असेही म्हणता येत नाही, परीक्षा काय आणखी देता येतात मने शाबूत राहावी लागतात, ती ठेवण्यात पालकांनी संयमाची भूमिका बाळगायला हवी.
आज जीवनात यशोशिखरावर असलेले अनेकजण दहावी बारावीत नापास झाले होते, काही तर या परिक्षांपर्यंत पोहोचूही शकले नव्हते, म्हणून काय त्यांची वाटचाल थांबली नाही, यशाला नवी पहाट समजा आणि अपयशाला यशाची पहिली पायरी, आणि लागा कामाला, न खचता नव्या जोमाने…..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.