Sunday, May 19, 2024

/

तुम्हीच कन्नडमध्ये बोला-जिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला

 belgaum

Mes delegationमराठी भाषेत परिपत्रिक ध्या भाषिक अल्पसंख्याक कायद्याच्या तरतुदी नुसार मराठी फलकांची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर मराठीतर संघटना करत आलेत गुरुवारी देखील शहर समितीच्या शिष्टमंडळाने मराठी साठी एन जयराम जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन दिले यावेळी जयराम यांनी मागणीची पूर्तता करण्या ऐवजी उलटा समिती नेत्यांना कन्नड शिकण्याचा सल्ला दिलाय .
शहर समिती टी के पाटील, किरण गावडे,रेणू किल्लेकर,मोहन बेळगुंदकर,किरण सायनाक,शिवाजी सुंठकर आदींनी जयराम यांना निवेदन देत मराठी पत्रकांची मागणी करत आपण चार वर्षे झाली बेळगावात आहात एक आय ए एस या नात्यानं मराठीत बोला अशी विनंती केली असता तुम्ही जन्मभर बेळगाव कर्नाटकात रहात आलाय कन्नड शिका आणि कानडीत बोला असा उलटा प्रति प्रश्न करत पुन्हा एकदा मराठी द्वेष दाखवुन दिला.आम्ही जर कन्नड येत असेल तर बोलू कन्नड बोलू मात्र आमचे लोकशाही ने दिलेले अधिकार आम्हाला ध्या अशी मागणी समिती नेत्यांनी केली. कितीही आंदोलन मोर्चे काढा भाषिक अल्पसंख्याक कायद्याची अंमलबजावणी बेळगावात होणे कठीण दिसत आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टातील याचिके वर सगळं लक्ष लागलं आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.