बेळगाव शहर परिसरात 52 हजार इ एस आय सुविधेशी जोडले गेले आहेत त्यांच्या पगारातून इ एस आय शुल्क भरले जाते मात्र त्यांना हॉस्पिटल मधून आवश्यक सुविधा मिळत नाही या कामगारांना आरोग्य सुविधा पुरवा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या माजी अध्यक्ष फोरम तर्फे करण्यात आली आहे.
अशोक नगर इ एस आय इस्पितळाचे सुप्रीन्टेडेंट म्हणून डॉ रामकृष्ण नलवार यांनी नुकतंच सूत्र स्वीकारली आहेत. नलवार यांची भेट घेऊन चेंबर फोरम ने मागणी केली आहे.फोरम चे सतीश तेंडुलकर,बसवराज जवळी,सेवंतीभाई शहा, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
इ एस आय इस्पितळात डॉक्टर वर्गाची कमतरता आहे वाढीव आरोग्य सुविधा दिल्या गेल्या नाहीत के एल ई इस्पिटळाशी असलेले सबंध तोडले गेलेत त्यामुळं रुग्णांची परवड होत आहे. के एल ई शी पुन्हा करार करावा आणि रिक्त पद पुन्हा भरावी अशी मागणी फोरम ने निवेदनाद्वारे केली आहे