मुलांना शाळेला सुट्टी झाली वॉटर पार्क आणि फन वर्ल्ड ची मजा घेण्यासाठी आता कोल्हापूर बंगळुरू किंवा एस्सेल वर्ल्ड मुंबई जावं लागत होत मात्र आता बेळगाव शहराच्या केवळ ११ कि मी अंतरावर यशनिश फन वर्ल्ड आणि वाटर पार्क सुरु होत आहे . कुट्टलवाडी गावाजवळ सहा एकर जागेत हे वाटर पार्क बनविण्यात आले असून आगामी २७ एप्रिल रोजी याच उदघाटन करण्यात येणार असून उद्योग मंत्री आर व्ही देशपांडे आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित राहणार आहे . २९ एप्रिल पासून जनतेसाठी हे वाटर पार्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
यश निश वाटर पार्क चे संचालक महेश अरकसाली यांनी सांगितले की पूर्ण दिवस भर संपणार नाहीत एवढे गेम्स या फन वल्ड मध्ये ठेवण्यात आले असून लहां मुला पासून ७० वर्षाच्या वयस्कर साठी खेळता यावेत असे गेम्स ठेवण्यात आई आहेत . एकूण सहा एकर जागेत इको फ्रेंडली कामाने हे वाटर पार्क तयार करण्यात आला आहे यासाठी २५०० झाड आम्ही लावली आहेत कोल्हापूर वाटर पार्क पेक्षा वेगळी थीम बनविली असून त्यामुळे देशातील एक आगळ वेगळं फॅन पार्क बेळगाव कराना अनुभवायला मिळणार आहे .
सुरुवातीला असणार डिस्कॉऊंट
सकाळी दहा ते सांयकाळी सहा पर्यंत हे वाटर पार्क खुलं असणार आहे एका व्यक्ती ला ६६० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे . यात अडीच ते साडे चार वर्षाचा खालील मुलांना ४५० रुपये प्रवेश शुल्क असेल . २९ एप्रिल ते १५ मे पर्यंत प्रवेश शुल्क २५ टक्के डिस्कॉउंट देण्यात येणार असून ६६० रुपये ऐवजी ४९० रुपये आकारण्यात येणार आहे . या शुल्कात दुपारचे शुद्ध शाकाहारी भरपेट जेवण , चहा देण्यात येणार आहे .
असं असणार आहेत सुविधा
या फॅन वल्ड मध्ये वाटर पार्क च्या शेजारी ड्राय गेम्स झोन बनविण्यात आला असून यात पेंट बॉल , स्लेगवे ,आर्चरी , डॉर्ट,ए टी व्ही रायडर्स , ट्रॅम्पोलिन, उंच उडी , वेगवेगळ्या प्रकार मनोरंजन होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे . वेगवेगळ्या खेळासाठी वेगळं शुल्क आकारण्यात येणार आहे . वाटर पार्क मध्ये फोर साईड्स , रेन डान्स , बम्पर बोट , बनाना राईड , वॉल क्लायंबिंग असे १५ प्रकारचे खेळ आहेत