Sunday, January 5, 2025

/

बेळगावातील अभियांत्रिकी विद्यार्थिनीचे अपहरण पोलीस तपास यशस्वी

 belgaum

बेळगावातील एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीचे तीची मैत्रीण आणि मैत्रिणीच्या लव्हरने अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. अर्पिता नायक, वय २३, रा: टिळकवाडी येथील साई प्लाझा अपार्टमेंट असे तिचे नाव आहे. ती जी आय टी कॉलेजमध्ये शिकते.

सोमवारी दि १७ रोजी रात्री जेवणासाठी मैत्रीण दिव्या मलघान हिच्याबरोबर ती गेली होती, मात्र घरी परतली नव्हती.दिव्या आणि तिचा गदग येथे वास्तव्यास असलेला लव्हर केदारी या दोघांनी पैश्यांसाठी तिचे अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे.

बेळगावातील एक हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर नारळ पाण्यात गुंगीचे औषध घालून तिला बेशुद्ध करण्यात आले होते.त्यानंतर आईला फोन करून अर्पिताने आपले अपहरण केल्याचे सांगितले होते, यावरून टिळकवाडी पोलिस स्थानकात ६ जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डीसीपी जी राधिका यांच्या नेतृत्वाखाली विशेष टीम च्या माध्यमातून शोधकार्य राबविण्यात आले. या पोलिसी कारवाईला यश आले असून अर्पिता गदग येथे सापडली आहे, तिला बेळगावला आणण्यात येत आहे.
हे अपहरण की साऱ्यांनी पैश्यांसाठी केलेला डाव हे अजून स्पष्ट झाले नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.