Thursday, April 25, 2024

/

पाच कोटी साठी मैत्रिणीकडून अपहरण

 belgaum

पाच कोटी रुपये मिळविण्यासाठी इंजियरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका विध्यार्थीनीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्याच मैत्रिणीचे अपहरण केले पण पोलिसांनी फिल्मी स्टाईल ने कारवाई करून अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुखरूप सुटका करून प्रियकर प्रेयसीच्या मुसक्या आवळल्या .
दिव्या मलघाण अस प्रेयसी ,केदार हणमंत पाटील हा प्रियकर आणि कार चालक बबलू उर्फ सुमित सभापुर अशी आरोपींची नाव असून त्यांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दिव्या देखील जी आय टी इंजिनियरिंग कॉलेज ची विध्यार्थीनी असून दिव्याचा प्रियकराच नाव केदार हनमंतराव पाटील आहे. जी आय टी ची विध्यार्थीनीं अर्पिता नाईक 23 राहणार साई प्लाझा टिळकवाडी अस अपहरण झालेल्या युवतीच नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या नुसार आरोपी दिव्याने आपल्या प्रियकर केदार सह मैत्रीण अर्पिताला 17 एप्रिल रोजी रात्री नियाज हॉटेल जेवणाला गेले होते त्यावेळी जेवण झाल्यावर नारळाच्या पाण्यात झोपेची गोळी देऊन तोंडाला क्लोरोफार्म रुमाल बांधून इंडिका कार मधून अपहरण केलं होतं.

दिव्या आणि केदार ने अपहरण करून अर्पिताला गदग येथे केदार च्या घरी डांबून ठेवलं होतं आणि अर्पिताच्या वडिलांकडून पाच कोटी ची फिरोती मागितली होती. धारवाड मध्ये राहणाऱ्या अर्पिताच्या वडिलांनी टिळकवाडी पोलिसांत तक्रार दिली होती.खडे बाजार पोलिस ए सी पी जयकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने गदग ला जाऊन अपहरण कर्त्यांच्या मुसक्या आवळत अर्पिताची सुटका करून अर्पिताला सुखरूप बेळगावला आणले.

तिरुपतीला 70 लाख

 belgaum

अपहरणकर्त्यांनी अपहरण यशस्वी होणासाठी अनेक वेळा मंत्र करणी करणाऱ्या जवळ बंदोबस्त करून घेतला होता असल्याची माहिती समोर आली आहे अपहरनात KidnappingKidnapperकोणतेही विघ्न येऊ नये यासाठी तिरुपती ला खास पूजा केली होती करणी मंत्र केलं होतं जर हे अपहरण यशस्वी झाल्यास 5 कोटी पैकी 70 लाख रुपये देवाला देणार होते अशी माहिती देखील तपासात समोर आली आहे असं डी सी पी जी राधिका आणि अमरनाथ रेड्डी यांनी स्पष्ट केलं आहे.

दोघी सख्या मैत्रिणी
दिव्या आणि अर्पिता या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या दोघी जी आय टी कॉलेज च्या विध्यार्थीनी आहेत केदार पाटील हा मंत्र करणी करण्याचं काम करणारा आहे अशी देखील माहिती समोर आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.