बेळगाव पिकाला पाणी पाजवायला गेलेल्या महिलेला सर्प दंश झाल्याने मृत्य झाल्याची घटना बिजगरणी येथे घडली आहे.रविवारी पहाटे सहाच्या सुमारास घटना घडली आहे. लक्ष्मी नारायण भास्कळ वय 42 वर्ष असं या मृतक झालेल्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.
आपले पतीं नारायण याच्या सोबत लक्ष्मी पिकाला पाणी पाजवायला शेतात गेली होती पिकाला थंड वेळेत पाणी पाजवावं लागतंय म्हणून पाणी पाजवायला गेलेली त्यावेळी विषारी सापाने दंश केला होता तातडीनं त्यांना उपचारा साठी सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान दुपारी सदर महिलेचा मृत्य झाला आहे . तिच्या पश्च्यात पती 2 मुलगे 1 मुलगी आहेत. साप चाऊन अचानक लक्ष्मी यांच निधन झाल्याने बिजगरणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यासत येत आहे.
