Friday, April 19, 2024

/

शिवसृष्टीचे राजकारण कशासाठी

 belgaum

Belgaum shiv srushtiशिवाजी उद्यानात बनविण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उदघाटन करून ती नागरिकांसाठी खुली करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे, मात्र तिचे उदघाटन होऊ नये म्हणणारे काही झारीतील शुक्राचार्यही आहेत, यामुळे होणारा विलंब संताप वाढवू लागला आहे. श्रेयवादाची राजकारणे न करता शिवश्रुष्टी शिवभक्तांसाठी खुली होण्याची गरज आहे.
काय आहे हा श्रेयवाद?
शिवश्रुष्टीचा श्रेयवाद राजकारणातील वर्चस्व वादाचा प्रकार आहे, स्वतःच्या काळात शिवसृष्टी साठी निधी मंजूर करून आणलेल्या एका अतिमहत्वाकांक्षी राजकारण्याने केलेला हा प्रकार आहे. अशा कारणातूनच हातातील सत्ता गेली यामुळे पुन्हा ती खेचून आणण्यासाठी शिवभक्तांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या वातावरणात श्रेय मिळवू पाहणाऱ्यांचे खरे रूप सामोरे येऊ लागल्याने शिवभक्त संतापत आहेत.

वोट बँक साठी शिवाजी महाराजांचा वापर महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षानी केलाय बेळगावातही शिवाजी महाराजांचा वापर राजकीय  पक्षांनी केलाय शिव जयंती उत्सव सरकारी पातळी वर साजरा करण्याचा असो किंवा आणखी काही कायम राजकीय पक्ष वोट बँकेवर डोळा ठेऊन असतातच
शिवजयंतीच्या तोंडावर शिवसृष्टी खुली व्हावी हि मागणी जोर धरत आहे. राजकीय पक्षाच्या गोटात अडकलेले मराठाजनही हि मागणी करू लागले आहेत.याकडे महापालिकेने लक्ष द्यायला हवे, राजकीय मंडळींच्या ताटाखालचे मांजर बनण्यापेक्षा नागरी भावनांकडे लक्ष द्यायला हवे नाहीतर त्या भावना अधिक संतप्त होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.