हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणी नंतर बेळगाव ट्रॅफिक पोलिसांनी कार चालवणाऱ्या सीट बेल्ट परिधान न करण्यावर कारवाई स सुरुवात केली आहे . पहिल्या ट्राफिक उत्तर विभागाच्या पोलिसांनी कार ड्रायविंग करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे नोंदवुन दंड वसूल केला आहे.
आतापर्यंत कार चालक आणि समोरील बसलेल्या व्यक्तीस सीट बेल्ट घालणे हे फक्त बंगळूर मुंबई सारख्या मेट्रो सिटी मध्ये बंधनकारक होत.बेळगाव सारख्या लहान शहरातून याची अंमल बजावणी केली जात नव्हती आता हेल्मेट नंतर सीट बेल्ट न घालणाऱ्या वर देखील कारवाई केली जात आहे .
ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट सोबत फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकावरील मोहीम तीव्र केली असून 5 फॅन्सी नंबर प्लेट चे केस केल्या आहेत .प्रेस ,पोलीस, आर्मी , सरकारी लोगो नंबर प्लेट वर घालणाऱ्यांची देखील पोलिसांनी तपासणी सुरु केली आहे. गाडी चालवते वेळी मोबाईल वापरणाऱ्या वर कारवाई कधी सुरु करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे