Friday, April 26, 2024

/

गटाची बैठक बोलवा अन्यथा सर्वसाधारण बैठकीस अनुपस्थित- उपमहापौर

 belgaum

बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता आली मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाले तरी देखील अजूनही पालिकेतील मराठी नगरसेवकात एकीच चित्र अजूनही अलबेलच आहे. महापौर निवड होऊन एक महिन्याचा काळ लोटला तरी १० एप्रिल ला पालिकेची पहिली सर्वसाधारण बैठक ठरविण्यात आली आहे मात्र अस असताना मराठी नगरसेवकात एकीच चित्र दिसत नाही आहे अश्यातच उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी सर्वसाधारण बैठकीच्या अगोदर ३२ मराठी नगरसेवकांच्या गटाची बैठक बोलवा अन्यथा उपमहापौर म्हणून मी सर्वसधारण बैठकीस अनुपस्थित राहणार असा इशारा दिला आहे.

पहिला ठरवल्या प्रमाणे मराठी गटातील ३२ नगरसेवकांची मराठी गटाची अध्याप एकही बैठक झाली नाही गट नेते पद कुणाला कायम स्वरूपी नाही आहे असा असताना किरण सायनाक आणि पंढरी परब यांनी मला उपमहापौर म्हणून डावलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे गटाची  बैठक घेतल्या शिवाय मी सर्वसाधारण बैठकीला हजर राहणार नाही अस देखील मंडोळकर यांनी म्हटलं आहे . आगामी  काही दिवसात अशीच परिस्थिती राहिली जर का दुसऱ्या बैठकी पर्यंत सर्व ३२ नगरसेवकांची बैठक घेतली नाही तर मी कॉंग्रेस प्रवेश करीन असा इशारा देखील मंडोळकर यांनी दिला आहे .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.