Saturday, May 4, 2024

/

समितीला मिळाली ‘पुढारी’करांची मिळाली साथ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : वर्तमानपत्र क्षेत्रातील दणकट नाव म्हणून ‘पुढारी’ या वृत्तपत्र समूहाला महाराष्ट्रात ओळखले जाते. डॉ प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच सीमा वासियांची पाठराखण केलेली आहे. ज्या ज्या वेळी सीमा वासी यांच्यावर अत्याचार झाला त्यावेळी महाराष्ट्रात बुलंद आवाज करण्याचं काम पुढारीकरांनी केलं आहे.

गेली 100 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात असणाऱ्या पुढारीकरांमुळे सीमावर्ती भागातील जनतेला आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ मिळाले. अशाच कणखर व्यासपीठाच्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव पाटील आणि कारवार लोकसभा मतदार संघाचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळासह दैनिक पुढारीचे संपादक डॉ. प्रताप सिंह जाधव यांची कोल्हापूर मुक्कामी भेट घेतली.

डॉ जाधव यांनी मतदार संघ प्रचार यंत्रणा मराठी माणसाची स्थिती संघटन या विषयी सखोल चर्चा केली आणि मार्गदर्शनात्मक सूचनाही केल्या. दैनिक पुढारी सीमावासियांच्या पाठीशी नेहमी प्रमाणे ठामपणे उभे उभे राहील असे आश्वासनही दिले याव्यतिरिक्त गरज पडल्यास कोणतीही भूमिका पुढारी स्वीकारेल आणि मराठी माणसाच्या पाठीशी राहील असाही त्यांनी आश्वासक सांगितले.

 belgaum

पुढारीकरांच्या या भूमिकेमुळे उमेदवारांच्या एकंदर प्रचार यंत्रणेला जोर आला आहे. महाराष्ट्रभर सीमावासियांची उमेदवारांची भूमिका पटवून देण्यात पुढारी निश्चित यशस्वी होईल यात काही शंका नाही असे मत उमेदवारांनी यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर कोल्हापूरकर जनता पुढारीच्या माध्यमातून उभे करण्यात पुढारीकर नेहमीच यशस्वी झाले आहेत.Pudhari

त्याचप्रमाणे यावेळीही जे लोक कोल्हापुरात बेळगावकर आहेत त्यांच्या माध्यमातून बेळगाव परिसरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रयत्न करण्याचे पुढारीकरानी आश्वासन दिले त्यामुळे एकंदर प्रचार यंत्रणेला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

बेळगावसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्षीयांना एकत्र करून बेळगावचा सीमाप्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न करूया, लोकसभा निवडणुकीनंतर सीमापरिषद आयोजित करून चर्चा करूया असे आश्वासन देखील दिले आहे. सीमावासियांच्या या चळवळीत पुढारीकारांची नव्याने साथ लाभल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांमध्ये सकारात्मकतेने वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य विकास कलगटगी, खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, अध्यक्ष गोपाळराव देसाई आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.