इशारा दिल्यावर सोमवारी सायंकाळी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात सुनावणी झाली . शहापूर पोलिसांनी १०७ कलमा अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आठ संयोजकांवर खटला दाखल केला होता . त्या खटल्याची सुनावणी पोलीस उपायुक्तांसमोर झाली आणि तो खटला निकालात काढण्यात आला . दुसरा खटला खडेबाजार पोलिसांनी दहा संयोजकांवर कलम १०८ घातला आहे .भडकावू भाषण केल्याचा पुरावा म्हणून मोर्चाच्या दिवशी भाषण केलेल्या मराठी भाषणांचा कन्नड अनुवाद करण्यात आला आहे आणि तो पोलीस उपायुक्ता समोर खडेबाजार पोलिसांनी हजर केला आहे .या सीडीच्या अनुवादाबाबत मराठा मोर्चा संयोजकांचे वकील महेश बिर्जे यांनी आक्षेप नोंदवला . सीडी आणि भाषणाचा करण्यात आलेला कन्नड अनुवाद तपासून पाहण्यासाठी आपल्याला वेळ देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी केली . त्यावर सीडी आणि अनुवाद देण्याचे मान्य करून पोलीस उपायुक्तांनी पुढील सुनावणी 08 मे रोजी होणार आहे .
Less than 1 min.
Previous article