Friday, December 27, 2024

/

राम सेनेची राम नवमी निमित्य शोभायात्रा

 belgaum

हिंदुत्वाच्या आडवी येणारी सगळी सरकार संपली असुन समस्त हिंदु अयोध्येत राम मंदिर उभारतील असा विश्वास राम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावात मंगळवारी सायंकाळी श्री राम सेनेच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली यावेळी श्री राम प्रतिमेची पूजा केल्या नंतर ते बोलत होते.
राम नवमी ची शोभा यात्रा काढण्यासाठी कोर्टातून परवानगी मिळवावी लागते अश्या सरकार ला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली असून पोलीस आयुक्त दुजाभाव करत असल्याचं देखील यावेळी मुतालिक म्हणाले.

आंबेडकर गार्डन पासून शोभायात्रेस सुरुवात झाली ते टिळक चौका पर्यंत काढण्यात आली .शोभा यात्रेत ढोल पथक भगवे ध्वज घेऊन शेकडो राम सैनिक सामील झाले होते. भाजप नेते अनिल बेनके, राम सेनेचे रमाकांत उपस्थित होते.पोलिसांनी विना डॉल्बी शोभा यात्रेस परवानगी दिली होती मात्र या शोभा यात्रेस डॉल्बी लावण्यात आली होतीRam navami belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.