मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळासह कार्यकर्त्यांनी केलेल्या सुचने नुसार पालिकेच्या वतीनं शिवजयंती आणि बसवजयंती मिरवणुकीस सुविधा देण्यात येतील अस वक्तव्य महापौर संज्योत बांदेकर यांनी केलं आहे.महापौर कक्षात अधिकारी नगरसेवक आणि शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी बैठक झाली .यावेळी पालिका आयुक्त एम शशीधर कुरेर, आमदार संभाजी पाटील, उपमहापौर नागेश मंडोळकर, गटनेते पंढरी परब, किरण सायनाक,विनायक गुंजटकर, सरिता पाटील यांच्यासह शहापूर विभाग शिव जयंती मंडळ मध्यवर्ती शिव जयंती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संभाजी चौक आणि नाथ पै चौकात पब्लिक गॅलरी उभा करू ,मिरवणुकीत ठिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोबाईल टॉयलेट्स, स्क्रीन डिस्प्ले उभ्या करू याशिवाय मिरवणूक मार्गात आणखी एकदा पाहणी करून सर्व सुविधा देऊ अस देखील महापौर म्हणाल्या.
यावेळी मदन बामणे यांनी शिव जयंती मिरवणुकीत डॉल्बी लाऊन हिडीस नृत्य करणाऱ्या मंडळाना दुसरा मार्ग द्यावा अशी मागणी केली नगरसेवक रमेश कसळसनावर यांनी बसव आणि शिव जयंती मार्गावर काही तास पूर्वी पाणी मारावे अशी मागणी केली ज्यामुळं गर्मीत मार्ग थंड होईल गणेश दद्दीकर यांनी सी पी एड मैदान संभाजी उध्यान आणि टी टिळकवाडीत बाहेरून चित्ररथ पाहायला येणाऱ्यांची पार्किंग व्यवस्था करावी संभाजी चौकातील पब्लिक गॅलरी वनिता विध्यालय पर्यंत वाढवावी अशी मागणी केली.
बसव जयंती उपाध्यक्षानी मिरवणूक मार्गात सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवण्याची मागणी केली.
शिव सृष्टीचं काम वेळेत पूर्ण करून 28 एप्रिल रोजी उदघाटन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.