मालवण दुर्घटनेत समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजच्या 8 विद्यार्थ्यांचे मृतदेह शनिवारी रात्री उशिरा बेळगावात आणण्यात आले .रात्री 11 च्या सुमारास चार रुग्ण वाहिकेतून सगळे मृतदेह शिनोळी मार्गे बेळगावात आणण्यात आले होते पाच मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल च्या शवागारात ठेवण्यात आले आहेत तर तिघांवर रात्री उशिरा अंतिम संस्कार करण्यात आले
रविवारी सकाळी काकती येथें नितीन मुतनाडकर शहापूर येथे प्रा महेश कुडुचकर, शहर सदाशिवनगर स्मशानभूमीत अवधूत ताशीलदार, बेळगाव मुस्लिम स्मशान भूमीत मुझम्मील हन्नीगेरी, तर बंबरगा येथे माया कोले यांच्या मृतदेहावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे. सिव्हिल हॉस्पिटल परीसरात मृतकांच्या नातेवाईकानीं गर्दी केली होती . घटना कळल्यावर मराठा मंडळचे प्राचार्य विश्वनाथ उडुपी,संचालक प्रताप यादव, नागेश झंगरुचे , सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, नगरसेवक बाबुलाल मुजावर, शिवाजी सुंठकर आदी कोकणात मालवण ला रवाना झाले होते. सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मृतकांच्या नातेवाईकानी हंबरडा फोडला सारे चित्र हृदय द्रावक होते .जिल्हा हॉस्पिटल शवगारात जवळ भाऊ गडकरी महादेव पाटील आदी उपस्थित होते
सांबरा आणि चिरमुरीत रात्रीचं अंत्य संस्कार
सांबरा येथील आरती चव्हाण,आणि करुणा बर्डे यांच्या वर रात्री उशिरा सांबरा येथे तर चिरमुरीत किरण खांडेकर या विध्यार्थ्याच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले .
सांबरा गावावर शोककळा
एकाच गावातील दोन मुली दगावल्याने संपूर्ण सांबरा गावावर अवकळा पसरली आहे. आरती चव्हाण आणि करुणा बर्डे अशी त्यांची नावे आहेत.
यापैकी आरती ही दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक आणि मायमराठी संघ सांबराचे अध्यक्ष दिलीप चव्हाण यांची कन्या. तिच्या पश्चात आई वडील व दोन बहिणी आहेत.
करुणा च्या पश्चात आई व एक लहान भाऊ आहे. तिची आई शेवया बनवून कुटुंबाची गुजराण करते, वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे