जमिनीच्या वादातून स्वतःच्या काकाचं धड धारधार हत्त्यारान कापुन स्वतः होऊन पोलीस स्थानकात हजर झालेला आरोपी पुतण्या सबळ पूराव्या अभावी निर्दोष झाला आहे. 14 मे 2014 रोजी सदर घटना वडगाव येथे घडली होती संपूर्ण शहरात या घटनेने त्यावेळी खळबळ उडाली होती.
वडगाव स्मशान भूमीत मयत राजू पाटील 55 हे बाकड्यावर बसले असता पाळती वर असलेल्या विकी पाटील 23 याने राजू यांचा धारधार हत्याराने चिरून धड घेऊन पोलीस स्थानकात हजर झाला होता.
जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला चालला होता. सत्र न्यायाधीश सतीश सिंह यांनी या प्रकरणाची तपासणी करून साक्षी आणि सबळ पुराव्या अभावी निर्दोष असा निकाल दिला आहे.