Sunday, May 5, 2024

/

बेळगावच्या महिला वकीलवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्याय

 belgaum

बेळगाव दि ८-जागतिक महिला दिनाच्या निमित्तान बेळगावातील एका महिला वकिलावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने अन्याय केला आहे.  दिवाणी न्यायाधीशाच्या तोंडी मुलखाती साठी बेळगावच्या वकील ज्योती पाटील या मुंबईत गेल्या असता क्षुल्लक कारण पुढे करून  लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी परीक्षा देण्यास मनाई करून अपात्र ठरविल आहे.

मुंबई येथे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी या तोंडी परीक्षांच आयोजन महर्षी कर्वे रोड मुंबई येथील लोकसेवा आयोगात सुरु होत्या. या न्यायाधीश परीक्षेस बेळगावातील वकील ज्योती पाटील गेल्या होत्या यावेळी प्रमाण पत्रांची छाणनी करताना बेळगावातील वकिलास वकिलास तोंडी परीक्षा देण्यास अपात्र ठरविले आहे. ज्योती पाटील यांनी आल इंडिया बर कोन्सील तसेच कर्नाटक बार कौन्सिल आणि बेळगाव जिल्हा सत्र न्यायाधीशांचे आवश्यक असलेले प्रमाण पत्र जोडेल होते. यावेळी राज्य लोकसेवा आयोगच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सुरु असलेली परीक्षा शेवटच्या सत्रात घेतो असे आश्वासन दिल आणि शेवटी सायंकाळी परीक्षा देण्यास अपात्र असल्याच सांगितल. राज्य लोकसेवा आयोगाच्या दोन परीक्षा ज्योती पाटील उत्तीर्ण झाल्या होत्या मात्र शेवटी तोंडी परीक्षा देण्यास त्यांना मनाई केल्याने सीमा भागात नाराजी व्यक्त केली जात आहे.  बेळगावात मराठी भाषिकांच नेतृत्व करणाऱ्या मध्यवर्ती  एकीकरण समितीचे सचिव मालोजी अष्टेकर यांनी ज्योती पाटील या एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून त्यांना तोंडी परीक्षेस परवानगी ध्यावी त्या बेळगाव  मराठी भाषिक आहेत ध्यावी अस पत्र  दिल होत.

एकीकडे बेळगाव मधील सीमा वासीय गेली ६० वर्ष महाराष्ट्रात येण्यासाठी न्याय मार्गाने झगडत असताना महाराष्ट्रा कडून सापत्नूकीची वागणूक मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा पारदर्शक पणा कुठे गेला ? बेळगावातील मराठी वकिलास न्याय मिळेल का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे .

 belgaum

संपर्क :

ज्योती पाटील  बेळगाव :०७४०६८ ८०६६९women advocate injustice

 belgaum

6 COMMENTS

  1. Good Sister that someone has taken a strong decision to protest against injustice. I think you should also file this case in RTI. I hope after going through all this Maharshtra government will show some positivity towards giving justice to you.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.