बेळगाव दि १७- शाहीर अमर शेख जन्मशताब्दी महोत्सव रविवारी ता.१९ रोजी मराठा मंदिरात होणार आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पहिले पाच हुतात्म्ये सीमाभागातील आहेत. तेंव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शाहीर अमर शेख आघाडीवर होते, यासाठी या शहिरांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने बेळगावात हा महोत्सव होत आहे, आणि याच वेळी ज्या शिवसेनेने या सीमालढ्यात मोठे योगदान दिले आहे, त्या शिवसेनेचे मुबंई महापालिकेचे नुतन महापौर आणि उपमहापौरांचा व बेळगावातील नुतन महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार होणार आहे. माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार नितेश राणे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्ताने महाराष्ट्राची लोककला हा तीन तासाचा कार्यक्रम ही होणार आहे, तरी मराठी भाषिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा,
कार्यक्रम सर्वांना खुला आहे. यासाठी आपल्या कुटूंबासह आपण वेळेवर उपस्थित रहावे.
स्थळ :- मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ , खानापूर रोड बेळगाव.
वेळ व दिवस :- रविवार ता. १९ रोजी दुपारी ४-०० ते रात्री ९-००पर्यँत.