belgaum

चव्हाट गल्ली होळी उत्सवाचा कार्यक्रम जाहीर; ‘असा’ होणार उत्सव

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे चव्हाट गल्ली, बेळगाव येथे उद्या सोमवार दि 2 आणि मंगळवार दि. 3 मार्च 2026 रोजी भव्य असा होळी उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा केला जाणार असून खालील प्रमाणे उत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

होळी सणानिमित्त आज रविवारी रात्री 10 वाजता रथ गाडा रंगवण्यासाठी व होळी आणण्यासाठी लागणारे साहित्य काढून ते साहित्य रथावर ठेवून श्री चव्हाटा मंदिराच्या ठिकाणी रथ आणून ठेवला जाणार आहे. त्यानंतर उद्या सोमवारी दि. 2 मार्च रोजी होळी आणण्यासाठी चव्हाट गल्लीतील भक्तांनी व बैलजोडी धारकांनी भुईकोट किल्ला येथे दुपारी ठिक 3 वाजता उपस्थित राहायचे आहे.

चंद्रग्रहणामुळे यावर्षी कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला आहे. सर्वानुमते ग्रहण वेधांच्या आधी मंगळवारी 3 मार्च रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान होळीचा अग्नि पेटविला जाणार आहे. त्यासाठी उद्या सोमवारी 2 मार्च रात्री 12 वाजता श्री चव्हाटा मंदिर येथे सर्वांनी जमा होऊन होळी उभी केली जाणार आहे.

 belgaum

मंगळवारी सकाळी 11:30 वाजल्यापासून चंद्रग्रहणाचे वेध सुरू होणार आहेत. त्यामुळे तत्पूर्वी होळीचा अग्नी पेटवल्यानंतर लोटांगणाचा कार्यक्रम होईल. तसेच त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता गाऱ्हाणे घातले जाईल व त्यानंतर नवसाचा नारळ निश्चित केलेल्या जागेवरून अर्पण करायचा आहे.

अंधारात दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना आपण फेकलेला नारळ दिसणार नाही. त्यामुळे तो फेकताना कोणत्याही भक्ताला इजा होणार नाही याची काळजी घेतली जावी. श्री चव्हाटा हे चव्हाट गल्लीतील एक जागृत देवस्थान असून होळीचा उत्सव शांततेत यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी सर्वांनी आयोजक व पंचमंडळींना सहकार्य करावे, असे आवाहन चव्हाट गल्ली पंचमंडळी, श्री चव्हाटा युवक मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव आणि गल्लीतील समस्त युवक मंडळांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.