Monday, April 15, 2024

/

बेळगावात हरवली माणुसकी …

 belgaum

आता बातमी सीमाभागातील पण मानवी संवेदना आहेत की नाही हे विचारणारी….. बेळगावात आज एक युवतीने रेल्वे ट्रॅकवर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केलीय…    पहिल्या रेल्वे गेट नजीक हा थरारक प्रकार घडला, हे दृश्य पाहणाऱ्यांचे हात पाय अक्षरशः थरथरू लागले होते. आणि त्याच वेळी काही जण ही दुर्दैवी घटना आपल्या कॅमेरा मध्ये कैद करत होते त्या युवतीचे शरीर जळत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न झालाच नाही, उलट मोबाईल कॅमेरावाले तिथं पुढं होते, काय म्हणावं याला …….पोलीस सूत्रांनी  दिलेल्या माहिती नुसार संजना चंद्रकांत अनगोळकर असं या युवतीचे नाव असून ती 20 वर्षांची होती. ती टिळकवाडी बेळगाव भागातच राहणारी असून मराठा मंडळ कॉलेज इंजिनियरिंग विभागात ती शिकत असल्याची माहिती देखील समोर आलीय. घटना स्थळावर पडलेली कॉलेज बॅगमुळे पोलिसांनी तिची ओळख पटली असून कोणत्या कारणाने तिने आत्महत्त्या केली असावी याबाबत पोलीस तपास करत आहेत. पण घटना पाहणाऱ्यानी त्याच वेळी मदतीचा हात दिला असता तर ह्या युवतीचे प्राण वाचले असते, हे मात्र नक्की…..sanjana suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.