Thursday, April 25, 2024

/

पत्रकार अकादमीतर्फे आमदार नितेश राणे यांचा सत्कार,

 belgaum

बेळगाव दि १७ – रविवार दि १९ रोजी बेळगावात आयोजित बेळगाव महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली चे आमदार नितेश राणे बेळगावला येणार आहेत. पत्रकाराच्या मुलीला न्याय मिळवून दिल्याबद्दल पत्रकार विकास अकादमी तर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी अकादमीच्या नेहरू नगर येथील कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
नुकत्याच एम पी एस सी परीक्षेच्या तोंडी परीक्षेत बेळगावच्या वकील ज्योती पाटील यांना नाकारले गेले होते. त्या पत्रकार डी के पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांच्यासाठी आवाज उठवून त्यांची तोंडी परीक्षा १५ मार्च रोजी होण्यात आमदार नितेश राणे यांचा वाटा मोठा आहे. यामुळे हा सत्कार होणार आहे.
याचवेळी आमदार राणे यांच्या हस्ते गरीब वृत्तपत्र विक्रेत्यांना सायकलींचे वितरण केले जाणार आहे. विशाल इन्फ्राबिल्ड चे संचालक विजय पाटील तसेच चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष फोरम च्या वतीने सतीश तेंडोलकर , बसवराज जवळी आणि सेवंतिभाई शाह यांनी या उपक्रमात सहकार्य केले आहे.
कार्यक्रमाला सर्व पत्रकार सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अकादमीच्या वतीने सेक्रेटरी प्रसाद सु प्रभू यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.