बेळगाव दि ९- माझी मैना गावावर राहिली अन माझ्या जीवाची कायली झाली.. हा पोवाडा भाषावार प्रांत रचनेत महाराष्ट्रापासून दूर गेलेल्या बेळगाव साठी गाणाऱ्या लोक शाहीर अमर शेख यांच्या जन्म शताब्दी निमित्य बेळगावात विविध कार्यक्रम केले जाणार आहेत.
स्वातंत्र्या नंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आघाडी घेतलेले शाहीर म्हणून शाहीर अमर शेख यांची ओळख आहे आजही त्यांच्या शाहिरीच्या पोवाड्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे गीत गरजले तर अंगावर शहारे येतात त्यांची आठवण म्हणून १९ मार्च रोजी मराठा मंदिरात कार्यक्रमाच आयोजन केल जाणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मराठा मंदिरात बैठकीच आयोजन करण्यात आल होत या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर मालोजी अष्टेकर होते. या बैठकीत १९ मार्च रोजी मराठा मंदिरात हा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांचीच स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर निधी संकलन,स्वागत आणि नियोजन अश्या समित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी बार्शी मध्येशेख जन्म शताब्दी महोत्सव करण्यात आला होता बेळगावात येत्या १९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमात नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार केला जाणार आहे . महा पालिकेत मराठी गटात एकी टिकावी यासाठी सर्व ३२ नगरसेवकांना या कार्यक्रमास आमंत्रित केल जाणार आहे . या कार्यक्रमासाठी खास बार्शीहून पथक येणार असून महाराष्ट्रातील पाहुण्यांना देखील आमंत्रित केल जाणार आहे. लोक वर्गणी तून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
बैठकीस सकल मराठा समाजाचे प्रकाश मरगाळे, राजेंद्र मुतगेकर, मदन बामणे, अप्पासाहेब गुरव, महादेव पाटील,गणेश दड्डीकर, सुनील बाळेकुंद्री,प्रकाश बापू पाटील, भागोजी पाटील, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, नेताजी जाधव, महेश जुवेकर, विजय होनगेकर,विशाल गौन्दाडकर, चंद्रकांत गुंडकल, गुणवंत पाटील, शिवाजी हंगीरगेकर, मधु बेळगावकर, वकील सुधीर चव्हाण, रामचंद्र मोदगेकर, आर आय पाटील,पियुष हावळ,सुरज कणबरकर, सतीश गावडोजी आदि उपस्थित होते.