बेळगाव दि ६- लखन जारकीहोळी यमकनमर्डी विधान सभा निवडणूक लढणारं हे पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच वक्तव्य खोडत लखन हे यमकंनमर्डी तुन नव्हे तर गोकाक मधून पुढील विधान सभा निवडणूक लढणार असल्याचं माजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटलंय . सध्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जारकीहोळी या एकाच कुटुंबातील वादग्रस्त भूमिका आणि अंतर्गत राजकीय वाद उफाळत चाललं आहे. दोन दिवसापूर्वी रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव महा पालिकेत बैठकीवेळी त्याचे लहान बंधू लखन यमकनमर्डी तर सतीश हे रायचूर मधून निवडणूक लढवणार असल्याच वक्तव्य केलं होत .सध्या दोनी आजी माजी पालक मंत्री बंधूंचा राजकीय कलगीतुरा जोरात रंगला आहे.
भविष्यात माझा कोणताही मतदार संघ बदलण्याचा प्लॅन नसून रमेश जारकीहोळी यांनी रायचूर मधून निवडणूक लढणार नाही . लखन यांना गोकाक हा मतदार संघ आरामदायक असून अनेकदा जारकीहोळी परिवाराने या मतदार संघावर कब्जा केला आहे इथे ग्राउंड तयार आहे त्यामुळे रायचूर ग्रामीण ला निवडणूक लढवणार नसून मी यमकनमर्डी लढेन तर लखन जारकीहोळी हे गोकाक मधून निवडणूक लढवेल अशी सतीश जारकीहोळी यावेळी म्हणाले . सध्या सतीश आणि रमेश या बंधुत अंतर्गत राजकीय कलह सुरु आहे . रमेश जारकीहोळी गोकाक आमदार आहेत विध्यमान पालकमंत्री आहेत तर सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी आमदार असून माजी पालक मंत्री आहेत तर भालचंद्र जारकीहोळी हे भाजप मध्ये असून अरभावी आमदार आहेत . सध्या एकाच तीन बंधू बेळगाव जिल्ह्यात आमदार आहेत चौथा भाऊ लखन जारकीहोळी पुढील विधान सभेत निवडणूक लढवणार आहे मात्र कोणता मतदार संघ लखन निवडतात याकडे जाणकारांचं लक्ष आहे
Trending Now