बेळगाव ९- शोर्ट सर्किट मुळे ऑटो नगर येथील टिस्को टेप कारखान्याला लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेच नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी मध्यरात्री वैजंती भाई पोरवाल नामक मालकीच्या टिस्को टेप प्लास्टिक कारखान्याला आग लागल्या नंतर अग्निशामक दला कडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीत एकूण ४ कोटी रुपयांची मालमत्ता जाळून खाक झाली आहे या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे ३५ महिला कामगार बेरोजगार झाल्या आहेत मालकास २ कोटींची हानी झाल्याची माहिती मिळत आहे . माळ मारुती पोलीस निरीक्षक टेंगरीकर अधिक तपास करत आहेत