बेळगाव दि ९- उचगाव ग्राम पंचायत विकास अधिकारी सुजाता बटकुर्ली या मनमानी करत असून त्यांना आवार घाला अन्यथा आंदोलन करू असा इशारा देत तालुक्यातील पाणी समस्या सोडवा अशी मागणी जिल्हा पंचायत अध्यक्षा कडे केली आहे.
जिल्हा पंचायत सदस्या आणि तालुका पंचायत सदस्यांचा एका शिष्टमंडळान जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे आणि तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. उचगाव जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रातील कोनेवाडी गावात पिण्याच्या पाण्याच्या समस्याचे उद्घाटन करण्यसाठी सदस्य सरस्वती पाटील यांनी आपले कार्यकर्ते मोनाप्पा पाटील यांना घेऊन करा असा आदेश दिला असला तरी उचगाव ग्राम पंचायत विकास अधिकारी सुजाता बटकुर्ली यांनी उद्घाटन कार्यक्रमात हस्तक्षेप करत पाईप वगैरे सामानाची उचल केली उद्घाटन कार्यक्रम होऊ दिला नाही.मराठी द्वेषाने या महिला अधिकारी पछाडल्या आहेत यांना तत्पर समज ध्यावा अधिकाऱ्यांनी राजकारण्या प्रमाणे वागू नये अन्यथा आंदोलन केल जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. बेळगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असून सोडवावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माधुरी हेगडे ,तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, भागोजी पाटील आदी उपस्थित होते