बेळगाव दि 9- आपला देश शेतीप्रधान असून गरीब , कष्टकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडी तर्फे करण्यात येत आहे, हि महिला दिनी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे,आणि त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले , त्याबद्दल मी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांची कृतघ्न आहे, असे उदगार महापौर संज्योत बांदेकर यांनी काढले.
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शेतकरी कुटूंबातील कर्तबगार महिलांचा व नुतन महापौर संज्योत बांदेकर यांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, महापौर संज्योत बांदेकर,माजी महापौर सरिता पाटील होत्या.कार्यक्रमाची सुरुवात महापौरांच्या सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली,
प्रास्ताविक करताना महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी ‘महिला दिनाचे’ महत्व सांगून , शेतकरी कुटूंबातील महिलांचा सत्कार करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आणि सर्व उपस्थितांचे स्वागत केले. अर्चना कावळे यांनी महापौर संज्योत बांदेकर यांचा परिचय करून दिला.रेणू किल्लेकर व सरिता पाटील यांच्या हस्ते महापौर संज्योत बांदेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्यांनतर आजच्या सत्कारमूर्तीचा परिचय श्रद्धा मंडोळकर, शामिनी पाटील, प्रभावती सांबरेकर, मंजुश्री कोळेकर, रेणू भोसले, निकिता उसुलकर, रूपा मुतकेकर, अनुपमा कोकणे, भाग्यश्री जाधव यांनी करून दिला, त्या सर्व सत्कारमूर्ती अनुसया सांबरेकर, रुक्मिणी अडकुलकर, शांताबाई कंग्राळकर, रुक्मिणी कंग्राळकर, आशादेवी रायजाधे, छाया हंडे, इंदूबाई डोंगरे, यशोदा इंगवले, लक्ष्मीबाई इंगवले, शोभा इंगवले, सुवर्णा मोरे, यांचा महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आभार कांचन भातकांडे यांनी मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले,
या कार्यक्रमाला महिला आघाडी व महिला आघाडी सोसायटीच्या सदस्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.