Wednesday, January 22, 2025

/

बेळगावात जैन कटारिया संमेलन

 belgaum

बेळगाव ,दि . ९-उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या जैन कटारिया समाजाचे संमेलन बेळगावात पार पडले . जैन कटारिया समाजाचे अध्यक्ष प्रकाश कटारिया यांनी  अध्यक्षपद भूषवले होते . संस्थापक अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह राजेंद्र कटारिया आणि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते .

                   एकत्र कुटुंब पद्धतीच सुदृढ समाजासाठी आवश्यक आहे . काही वर्षांपूर्वी आपल्या देशात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती . एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे देखील बरेच होते . जगतिकीकरणाच्या रेट्यात एकत्र कुटुंब व्यवस्था मागे पडली आणि पती ,पत्नी आणि एक मूल अशी कुटुंब पद्धती अस्तित्वात आली . या नव्या कुटुंब पद्धतीमुळे लहान मुले आपले बालपण हरवत चालली आहेत . आई वडील दोघेही नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर असल्यामुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाहीत . कुटुंबात ताण तणाव वाढत आहेत . त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती हीच आदर्श कुटुंब पद्धती आहे ,असे विचार जैन कटारिया समाजाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कटारिया यांनी व्यक्त केले .  केवलचंद कटारिया यांनी  कटारिया समाजाचा इतिहास कथन केला .
                    कटारिया जैन समाजाचे अध्यक्ष प्रकाश कटारिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करून पुढील दोन वर्षात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली .

                   प्रारंभी कुलदेवी आशापुरा माताजीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले .राजेंद्र कटारिया यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले .  महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बेळगाव,हुबळी ,रायचूर ,होस्पेट ,कोल्हापूर ,सातारा आणि इचलकरंजी येथून समाज प्रतिनिधी संमेलनाला उपस्थित होते .

Kataria jain
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.