Tuesday, December 31, 2024

/

पतीने करविला पत्नीस अनैसर्गिक संभोग

 belgaum

शय्यासोबत करताना विचित्र मागणी करून ती पूर्ण न केल्यामुळे पतीने आपल्या पत्नीस श्वानसंभोग जबरदस्तीने घडविल्याचा प्रकार घडला आहे. कटकोळ पोलीस स्थानकात याबद्दल पत्नीने फिर्याद दिली आहे. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद येथे घडलेला हा प्रकार खळबळजनक ठरला आहे.
त्या २५ वर्षीय महिलेने आपली व्यथा पोलिसांसमोर मंडळी, सध्या तिच्यावर सरकारी इस्पितळात उपचार सुरु आहेत, पतीने चुकीच्या पद्धतीने संभोग करण्याची मागणी केली, तिने नकार दिल्यावर तो भडकला आणि त्याने चक्क कुत्र्याला तिच्या अंगावर सोडून सलग तीनवेळा श्वान संभोग करण्यास भाग पाडले.
ब्ल्यू फिल्म बघून तेथील अनैसर्गिक प्रकार कर अशी जबरदस्ती तो वारंवार करीत होता, त्या घाणेरड्या फिल्म मध्ये ज्याप्रमाणे प्राण्यांशी संग केला जातो तसेच हीन प्रकार करून घेऊन त्याने तिला मुलांसहं घराबाहेर काढले आहे.
अशा पतीची विकृत मानसिकता त्या महिलेवर अनैसर्गिक शारीरिक अन्यायाचे कारण बनली आहे, यावर पोलिसांचा तपास सुरू आहे. पती पत्नीच्या पवित्र नात्याला गालबोट लावणाऱ्या त्या नराधमावर कारवाई करा अशी मागणी होत आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.